वाचा:
उपमुख्यमंत्री पवार यांनी व्हीव्हीआयपी सर्किट हाउस येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, क्रीडा विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या २०२१-२२ या वर्षाच्या आराखड्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या आराखड्यातील विकासकामे प्रलंबित असून, विकासनिधी अद्याप खर्च झालेला नाही. हा निधी खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
वाचा:
येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुल आणि बारामतीतील जिल्हा क्रीडा संकुल येथील नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचेही आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. , आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान, माहिती उपसंचालक राजेंद्र सरग, बारामतीचे मुख्यापधिकारी किरणराज यादव आदी उपस्थित होते.
कोंढव्यात हज हाउस
पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांसाठी कोंढवा येथे हज हाउस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या बैठकीला आमदार चेतन तुपे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे उपस्थित होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times