पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आज पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार होते. शहा शनिवारी सकाळी इस्कॉन, मायापूर येथे जाणार होते. यानंतर ते उत्तर २४ परगणामधील ठाकूरनगर येथे जाहीर सभांना संबोधित करणार होते. उत्तर २४ परगणा मधील अनेक विधानसभा मतदारसंघात मतुआ समाजाचे वर्चस्व आहे. नंतर संध्याकाळी ते भाजपच्या सोशल मीडिया टीमबरोबर बैठक घेणार होते.
दुसर्या दिवशी 31 जानेवारीला रविवारी ते अरविंदो भवन आणि भारत सेवाश्रम संघाच्या कार्यालयाला भेट देणार होते. हावडामधील एका सभेलाही ते संबोधित करणार होते. हावडातील सभेनंतर शहा हे बागडी परिवारासोबत जेवण घेणार होते. त्यांना बेलूर मठातही जायचं होतं. बेलूर मठ हे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे मुख्यालय आहे. रामकृष्ण परमहंसांचे महान शिष्य स्वामी विवेकानंद यांनी हा मठ स्थापन केला होता.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीतील वातावरण तणावाचं बनलं आहे. सिंघू सीमेवर आंदोलन करणार्या शेतकरी आणि स्थानिकांमध्ये शुक्रवारी संघर्ष आणि दगडफेकही झाली आणि त्यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे, शुक्रवारी संध्याकाळी इस्रायली दूतावासाबाहेर अत्यंत कमी तीव्रतेचा स्फोट झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा स्वत: घटनेच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत.
अमित शहा यांना स्फोटानंतरच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी पोलिसांना तपासासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची आणि कट रचणाऱ्यांना छडा लावण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहीत गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times