राज्य सरकारने आणि रेल्वेने मंजूर केलेली वेळ वगळता अन्य वेळेत सर्वसामान्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, आयपीसी १८८ आणि यानुसार कारवाई होईल, असे मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले.
विनागर्दीच्या वेळेत सर्वांना १ फेब्रुवारीपासून लोकलमुभा दिल्यानंतर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांना एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त रसद पुरवण्यात आली आहे. यात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि होमगार्ड यांचा समावेश आहे. यांच्या जोडीला रेल्वे सुरक्षा दलाकडून ही गर्दी नियोजनाचे काम करण्यात येईल.
वाचा:
गर्दी बाबत संवंदेनशील असलेल्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा पुरवण्यासाठी सरकारने २००० होमगार्ड आणि ६५० सुरक्षा महामंडळाचे जवान रेल्वे पोलिस दलास दिले आहेत. याचबरोबर आणि रेल्वे पोलिस असे एकत्र मिळून गर्दी रोखण्यासाठी कामगिरी बजावतील, असेही आयुक्त सेनगावकर यांनी स्पष्ट केले.
हेल्पलाइन सेवा
सायंकाळच्या सर्व महिला डब्यांमध्ये रेल्वे पोलिस नियुक्त करण्यात येणार असून कोणत्याही प्रवाशांना अडचण आल्यास त्यांनी १५१२ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. सध्या गर्दी कमी असल्याने रेल्वे स्थानक आणि परिसरात गुन्हे करणाऱ्यांवर विशेष कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times