वाचा:
एमआयएमचे खासदार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ‘महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील हे चित्र आहे. वाहनावरील लोगो सर्व काही सांगून जातो. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी वाट काढत असताना रिव्हॉल्व्हरचं ब्रँडिंग करीत होता. राज्याचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक याची दखल घेतील का,’ असा सवाल जलील यांनी केला आहे.
जलील यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक ट्विटरकरांनी हा व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, आदित्य ठाकरे यांना टॅग करून रीट्वीट केला आहे. शिवसैनिक आपल्याच पक्षाची बदनामी करत असल्याचं काहींनी म्हटलं आहे. ही सत्तेची गुर्मी असल्याचं काहींचं म्हणणं आहे
वाचा:
शिवसेनेकडून अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गाडीवर शिवसेनेच्या वाघाचे चित्र असले तरी पिस्तूल दाखवणारे लोक शिवसैनिकच आहेत का, याविषयी अद्याप काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times