वाचा-
( )ने हवेत उडी मारून सुपरमॅन ( ) प्रमाणे एका हाताने कॅच घेतला. एडिलेड स्ट्रायकर्सचा फलंदाज मायकल नेसरने मार्नस लाबुशेनच्या गोलंदाजीवर चेंडू हवेत मारला. लॉघलिनने तो चेंडू लॉग ऑनपासून पळत येत उजव्या बाजूला उडी मारत एका हाताने पकडला. लाबुशेनच्या फुलटॉस चेंडूवर नेसरने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता.
वाचा-
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia)ने या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी अश्विसनीय लॉघलिन असे म्हटले आहे.
वाचा-
एडिलेड स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजीकरत ७ बाद १३० धावा केल्या. त्यांच्याकडून जॅक वेदरलँडे सर्वाधिक ३२ धावा केल्या. लाबुशेनने ३ ओव्हरमध्ये १३ धावा देत ३ विकेट घेतल्या. ब्रिस्बेनने विजयाचे लक्ष्य १८.५ ओव्हरमध्ये ४ विकेटच्या बदल्यात पार केले. ब्रिस्बेन संघाकडून जिम्मी पियर्सनने ४७ तर सलामीवीर जो डेनली याने ४१ धावा केल्या. एडिलेड स्ट्रायकर्सकडून मायकल नेसर, वेस एगर, पीटर सिडल आणि डॅनी ब्रिग्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times