रांची : दीड किलोमीटर अंतरावरून पायी चालत पाणी आणण्याचा आजारी पत्नीचा त्रास वाचावा यासाठी पतीनं एक असं काम केलंय, ज्यामुळे तो सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय.

झारखंडच्याच दशरथ मांझी यांनी डोंगर खोदून रस्ता तयार केला होता. आता मांझी यांची प्रेरणा घेऊन या व्यक्तीनं आपल्या पत्नीसाठी डोंगरावर विहीर खोदून पाणी काढलंय.

चाडा पाहन हे खुंटी जिल्ह्यातील मुरहूच्या कोजडोंग गावचे रहिवासी आहेत. हे गाव शहरापासून अगदी २५ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु, गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. चाडा पाहन यांच्या पत्नीला पिण्याच्या पाण्यासाठी दररोज काही किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. त्यातच त्या आजारी असल्यानं त्यांच्या त्रासात आणखीनच भर पडली.

३५ वर्षीय चाडा पाहन गावातील इतर गावकऱ्यांसारखंच शेतात मजुरीचं काम करतात. चाडा पाहन यांना डोंगरावर भटकत असताना एके ठिकाणी पाणी झिरपत असल्याचं लक्षात आलं… आणि त्यांना आपली पत्नी तसंच गावातील इतरांना त्रासापासून वाचवण्यासाठी एक उपाय सापडला.

चाडा पाहन यांनी तब्बल सहा महिने डोंगर खोदून पाणी काढलं. जवळ असलेल्या हत्यारांसहीत त्यांना मोठमोठाले दगड फोडावे लागले. पाणी काढण्यासाठी त्यांना २० फूट खोल डोंगर फोडावा लागला. त्यामुळेच गावकऱ्यांसाठी ते झारखंडचे दुसरे ” ठरलेत.

गावकऱ्यांनी चाडा पाहन यांनी खोदलेल्या विहिरीत पाईप टाकून मोटारशिवाय आपल्या घरापर्यंत पाणी आणलंय. ” हा धडा चाडा पाहन यांनी गावकऱ्यांसमोर आणि देशासमोर आपल्या कृत्यातून मांडलाय.

वाचा :
वाचा :

झारखंडचा काही भाग आजही मागास अवस्थेत आहे. भौगोलिक स्थितीमुळे इथे आजही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष उलटली तरी आजही अनेक गावांत पाणी आणि वीज नाही.

उल्लेखनीय म्हणजे, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात पाणी पोहचवणं एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. ग्रामीण जलपूर्ती योजनेंतर्गत आत्तापर्यंत ३.४१ लाख ग्रामीण कुटुंबांपर्यंत पाणी पोहचवण्यात आलंय. येत्या वर्षापर्यंत १० लाख कुटुंबांना जोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here