ते परतवाडा मार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसेगाव पूर्णा येथे घडली. निवृत्ती दीपक सोलव (वय १४) आणि राज अनंत वैद्य (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. (Accident on Amravati Paratwada Highway)

वाचा:

निवृत्ती सोलव व राज वैद्य हे काल संध्याकाळी अचलपूर तालुक्यातील तळणी पूर्णा येथून दुचाकीने आसेगावकडे जात होते. समोरच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप (एमएच २७/ बीएक्स ३८१२) वाहनाची त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यामध्ये निवृत्ती सोलव हा मोठ्या प्रमाणावर भाजला. त्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर राज वैद्य त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here