यवतमाळ: ‘अनेक वर्षे राजकारणात असलेल्या प्रत्येकालाच मुख्यमंत्रिपदाची इच्छा असते,’ असं वक्तव्य करून राजकीय चर्चेला तोंड फोडणारे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी काल चक्क स्टेअरिंग हाती घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद दौऱ्यात घडलेल्या या प्रकारामुळं पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे.

वाचा:

पक्षविस्तारासाठी राष्ट्रवादीनं परिवार संवाद अभियानं सुरू केलं आहे. त्या निमित्तानं प्रदेशाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी राज्यभर दौरा करत आहेत. काल जयंत पाटील हे यवतमाळमध्ये होते. दिवसभर पक्षकार्याचा आढावा, सभा, बैठका, जिल्ह्याजिल्ह्यातील पदाधिकारी, जनतेशी गाठीभेटी असा पाटील यांचा भरगच्च दिनक्रम आहे. त्यामुळं सोबत असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांशी पक्षबांधणी विषयी सविस्तर चर्चा करता येत नाही. हे लक्षात आल्यानंतर शुक्रवारी रात्री जयंत पाटील यांनी स्वत: गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले आणि मध्यरात्री १ ते ३.१७ वाजेपर्यंत सुमारे अडीच तास गाडी चालवली. या दरम्यान त्यांनी सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे हे त्यांच्यासोबत होते.

वाचा:

पक्षवाढीसाठी जयंत पाटील करत असलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळं युवा टीम प्रभावित झाली. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, जयंत पाटील यांचे ड्रायव्हिंग सीटवरील फोटो झळकल्यानं त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here