नाशिक: येथील पेठ रोडवर ड्युटी निभावत असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत या पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. असे पोलिसाचे नाव असून ते हेड कॉन्स्टेबल होते. पोलिसांनी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना न जुमानता चालकाने कंटेनर गायकवाड यांच्या अंगावर घातला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ( News )

वाचा:

पेठ-गुजरात राज्य मार्गावर मधील येथे नाकाबंदी दरम्यान ही दुर्घटना घडली. कंटेनरखाली सापडून कुमार गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हळहळही व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

आज दुपारी जिल्हा वाहतूक विभागाच्या एका पथकाने तपासणी नाकाबंदी लावली होती. वांगणीफाट्यावर रस्त्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बडोद्याच्या दिशेने चाललेल्या कंटेनरला पोलीस पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वेगाने वाहन पोलिसांच्या दिशेने आणले. प्रसंगावधान दाखवत इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दूर उड्या मारल्या पण गायकवाड याबाबत दुर्भागी ठरले आणि कंटेनर खाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पेठ पोलिसांनी वाहन चालकास अटक केली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here