‘पठाण’ची घोषणा आणि या सिनेमातील शाहरुख खानचा फर्स्ट लुक समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या दुबईला सुरू असलं तरीही शाहरूख आणि त्याच्या टीमनं या चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे. मात्र दुबईतील एका चाहत्यानं या चित्रपटाच्या अॅक्शन सीनचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओंमध्ये टीम चालत्या कार आणि ट्रकवर चढून सीन शूट फाइटिंग सीन शूट करताना दिसत आहे. एका व्हिडीओ क्लिपमध्ये दोन व्यक्ती चालत्या ट्रकवर एकमेकांशी फाइट करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यावर अनेक युजर्सनी त्यांची तुलना ‘मिशन इम्पॉसिबल’ चित्रपटातील अॅक्शन सीन्ससोबत केली आहे.
दरम्यान या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेता जॉन अब्राहमची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. तर सलमान खान आणि हृतिक रोशन सुद्धा पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times