मुंबई: राज्यात आज ४२ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ६३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १ हजार ५३५ रुग्ण करोनावर मात करून आज घरी परतले आहेत. आज नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी असल्याने चिंतेत काहीशी भर पडली आहे. दुसरीकडे दैनंदिन रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा आता ४३ हजारांवरून ४४ हजारांवर गेला आहे. ( )

वाचा:

राज्यात करोना साथ पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटून काम करत आहेत. त्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळत असले तरी करोनाच्या आकडेवारीत रोज चढउतार पाहायला मिळत असल्याने हे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही, हे स्पष्टच आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने करोनाची आजची आकडेवारी जारी केली असून त्यात करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांच्या तुलनेत बरीच कमी असल्याचे आढळून आले आहे तर मृतांची संख्याही वाढतीच आहे.

वाचा:

राज्यात आज आणखी ४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत या साथीच्या विळख्यात सापडलेल्या ५१ हजार ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील २.५२ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ६३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून १ हजार ५३५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख २७ हजार ३३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९५.२३ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४५ लाख ५९ हजार १६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख २३ हजार ८१४ (१३.९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९१ हजार ९७५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार ३२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला आहे. ही संख्या ४३ हजारपर्यंत खाली आली होती. त्यात वाढ होऊन हा आकडा आज ४४ हजार १९९ इतका झाला आहे. यात सर्वाधिक १३ हजार ५०४ रुग्ण जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात सध्या ७ हजार ६७७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर पालिका हद्दीत हा आकडा ५ हजार ७६९ इतका आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here