मुंबई
: अभिनेता सैफ अली खानची मुख्य भूमिका असणारी
तांडव
वेबसीरिज काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली. मात्र ही वेबसीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. इतकंच नव्हे तर अनेक राजकारणी मंडळींनी देखील या वादात उडी घेतली. हिंदू देव देवतांचा अपमान तसेच हिंदूच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप या वेबसीरिजवर करण्यात आला आहे. सैफची ही वेबसीरिज वादात अडकलेली असताना त्याच्या आईला म्हणजेच अभिनेत्री यांना आपल्या लेकाची चिंता सतावत आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून
तांडव
चा वाद चांगलाच रंगला आहे. या वादामुळे सैफ ही अडचणीत आला आहे. शिवाय फेब्रुवारी महिन्यात सैफ-करिनाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या आनंदाच्या वातावरणामध्ये
तांडव
सारखा वाद सुरु आहे. याचा परिणाम सैफच्या खाजगी आयुष्यावर तर होणार नाही ना याची चिंता शर्मिला यांना सतावत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
तांडव
नंतर शर्मिला यांनी सैफला काही महत्त्वपूर्ण सल्ले दिले आहेत. कोणताही चित्रपट, वेबसीरिज करण्यापूर्वी पूर्णपणे विचार करुनच होकार दे असं शर्मिला यांनी सैफला सांगितले आहे. शिवाय कोणत्याही विषयावर आपलं वक्तव्य करण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला देखील शर्मिला यांनी सैफला दिला आहे.
तांडव
च्या वादानंतर सैफनेही यामधून चांगला धडा शिकला असल्याचंच दिसतंय.

कारण सैफने ही एक निर्णय घेतला आहे. प्रत्येक चित्रपट, वेबसीरिज करण्यापूर्वी त्याची नेमकी कथा काय आहे, कथेची निवड कशी करायची याचा पूर्णपणे विचार करायचं सैफने ठरवलं आहे. शिवाय प्रत्येक प्रोजेक्ट करण्यापूर्वी सैफ त्याच्या आईचं मत ही जाणून घेणार आहे.
तांडव
मध्ये सैफने रावणाची भूमिका साकारली आहे. ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर सैफवरही अनेक आरोप करण्यात आले होते.सैफबरोबरच सुनील ग्रोव्हर, तिग्मांशु धुलिया, गौहर खान, अमायरा दस्तुर सारखे कलाकारही या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here