वाचा:
आगामी काळात राज्यात विविध प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा सर्वच राजकीय पक्षांना आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या या पालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व असून ही पालिका काबीज करण्यासाठी विशेष करून भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी भाजप येत्या काळात मनसेसोबत युती करू शकतं, अशी जोरदार चर्चा आहे. अध्यक्ष यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा कालच करण्यात आली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मनसे आणि भाजपची जवळीक वाढू शकते, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
वाचा:
विशेषत: भाजपकडून या युतीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज यांची भेट घेतली होती. याशिवाय भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांकडून या युतीच्या शक्यतेवर अनेक प्रतिक्रियाही येत असतात. अशातच भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या एका विधानाने मात्र मिठाचा खडा पडला आहे. ‘मनसेसोबत युती करण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही स्वबळावरच इतिहास घडवणार आहोत’, असे शेलार म्हणाले आहेत. शेलार यांच्या या विधानाचा मनसे आमदार यांनी खरमरीत समाचार घेतला आहे. ‘आम्हाला युतीत घेता का असं विचारायला आम्ही कधीच भाजपपाशी गेलेलो नाही. त्यामुळे उगाचच झगा मगा आणि माझ्याकडे बघा, असे त्यांनी वागू नये. आम्ही जेव्हा विचारायला येऊ तेव्हा प्रतिक्रिया द्या’, अशा शब्दांत पाटील यांनी शेलार यांच्यावर तोफ डागली आहे.
वाचा:
दरम्यान, राज ठाकरे असोत वा मनसेतील अन्य नेते, त्यांची आक्रमकता नेहमीच पाहायला मिळालेली आहे. युती वा आघाडी याबाबत राज यांनी नेहमीच सडेतोड भूमिका घेतलेली आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांशी तडजोड करायची नाही, असाच त्यांचा खाक्या राहिला आहे. म्हणूनच भाजप व मनसेची युती होण्यासाठी समांतर दुवे कोणते असतील, ते पाहणे फारच औत्सुक्याचे ठरणार आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times