मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर () गाडीतून रिव्हॉल्वहरचा (Revolver) धाक दाखवून गाडी ओव्हरटेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पिस्तूल दाखणारे शिवसैनिक असल्याचे बोलले जात होते. यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. गाडीतून रिव्हॉल्वर दाखवणारे तिघे गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन रिव्हॉल्वरपैकी एक बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हे तिघे शिवसैनिक नसून आरोप करणाऱ्या राजकीय लोकांनी चुकीच्या पद्धतीने आरोप केले असल्याचे राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई () यांनी म्हटले आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा दाखवत असल्याचा प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर घडला होता. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला. पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

खासदार इम्तियाज जलील यांनी केला शिवसैनिकांचा उल्लेख
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा घडलेला प्रकार दाखवणारा व्हिडिओ शेअर केला होता. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील हे चित्र आहे. वाहनावरील लोगो सर्व काही सांगतो आहे. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी वाट काढत असताना रिव्हॉल्व्हरचे ब्रँडिंग करीत होता. राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक याची दखल घेतील का?,’ असा सवाल खासदार जलील यांनी केला होता.

क्लिक करा आणि वाचा-

जलील यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनेक ट्विटरकरांनी तर हा व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करून रीट्वीट देखील केला. हे शिवसैनिक आपल्याच पक्षाची बदनामी करत असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले होते. ही तर सत्तेची गुर्मी आहे, असेही काहींनी म्हटले होते. मात्र पिस्तुल दाखवणारे हे शिवसैनिकच नसल्याचे मंत्री शंभुराजे यांनी स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here