म. टा. प्रतिनिधी,

साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ समजल्या जाणाऱ्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात () यंदा पाच दिवसीय सोहळा होत आहे. किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी, सुर्यकिरणे देवीच्या चरणापर्यंत पोहचली. किरणोत्सव सोहळा होताच मंदिरात ‘अंबामाता की जय’चा घोष घुमला. देवीची आरती करण्यात आली. (sunrays reached the )

दरवर्षी अंबाबाई मंदिरात जानेवारी-फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात किरणोत्सव होतो. यंदा पाच किरणोत्सवाची पाच दिवस चाचणी घेतली जात आहे. शनिवारी सायंकाळी आकाश निरभ्र होते. सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटापासून सुर्यकिरणांचा प्रवास देवीच्या दिशेने सुरू झाला. पाच वाजून ३८ मिनिटाच्या सुमारास सुर्यकिरणी गरुड मंडपात पोहचली. तेथून हळूहळू सुर्यकिरणांचा प्रवास देवीच्या दिशेने सुरू झाले.

क्लिक करा आणि वाचा-
सायंकाळी सहा वाजून १४ मिनिटाला सोनेरी सुर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीच्या चरणाला स्पर्श केला. काही सेंकदातच किरणे लुप्त झाली. किरणोत्सव झाल्याने मंदिरात आरती झाली. आणखी तीन दिवस किरणोत्सव आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here