मुंबई : उपनगरीय लोकलप्रवास मर्यादित स्वरूपात सर्वांसाठी खुला केल्यानंतर आता मेट्रोच्या (Mumbai Metro) फेऱ्यामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून घाटकोपर ते वर्सोवा या मार्गिकेवर ही सेवा एक तास लवकर सुरू करण्यात येत आहे. या निर्णयामुळे मेट्रोच्या दिवसभरातील फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. ( of from 1st February 2021)

येत्या सोमवारपासून (१ फेब्रुवारी) वर्सोवा येथून घाटकोपरसाठी पहिली मेट्रोगाडी सकाळी ६.५० वाजता सुटणार आहे. तर, घाटकोपरहून वर्सोवासाठी पहिली गाडी सकाळी ७.१५ वाजता सुटणार आहे. दोन्ही ठिकाणच्या शेवटच्या गाडीच्या वेळांमध्ये १२ दिवसांपूर्वीच बदल करण्यात आला आहे. सोमवारपासून गाड्यांच्या वेळांमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. त्यानुसार वर्सोवाहून शेवटची गाडी रात्री ९.५० ला सुटेल. तर, घाटकोपरहून शेवटची गाडी ही १०.१५ ला सुटेल. सध्या सरासरी सहा ते आठ मिनिटांच्या फरकारने मेट्रोच्या फेऱ्या सुरू आहेत.

मेट्रोने स्थानकात येण्या-जाण्यासाठी मर्यादित दारेच खुली ठेवण्यात आली होती. प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवावे हा त्यामागील उद्देश होता. त्यामध्येदेखील बदल करण्यात येत आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून अंधेरी आणि घाटकोपर रेल्वे स्थानक ते मेट्रो स्थानक असा रेल्वे पादचारी पुलाचा मार्ग खुला करण्यात येत आहे. तसेच अंधेरी मेट्रो स्थानकावरून अंधेरी पश्चिमेस जाणारा मार्गदेखील प्रशाशांसाठी उपलब्ध असेल. यापूर्वी साकीनाका, मरोळ नाका, चकाला आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकांवरील दोन्ही बाजूंची प्रवेशद्वारे खुली करण्यात आली आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

मेट्रो १ वर सध्या दिवसाला २३० फेऱ्या होत आहेत. लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी म्हणजेच, १९ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच गेल्या चार महिन्यांत प्रवासी संख्येत वाढ झाल्याचीही नोंद झाली आहे. सध्या दिवसाला सुमारे ८० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here