म. टा. खास प्रतिनिधी,

देशभरात सध्या प्रथम क्रमांकावर असून यामध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. सायबर भामट्यांनी लाटलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. अशातच मुंबई सायबर पोलिसांनी एका व्यापाऱ्याचे १० लाख ७० हजार रुपये परत मिळवून दिले आहे. फसवणूक झाल्यानंतरच्या ‘गोल्डन अव्हर’मध्ये केलेली तक्रार आणि त्यावर तत्काळ कारवाई यामुळे पोलिसांनी गेल्या वर्षभरात सुमारे १५ कोटी रुपये वाचविले आहेत.

वडाळा येथील व्यापारी मनोज शहा यांना एका बनावट ई-मेलद्वारे फसवण्यात आले. काही कळण्याआधीच त्यांच्या बँक ऑफ इंडियामधील खात्यामधून १२ लाख ७० हजार रुपये परस्पर वळते करण्यात आले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट गाठले. सहायक पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, उपनिरीक्षक महादेव शिंदे आणि कॉन्स्टेबल सांगळे यांनी शहा याच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यास सुरू केले. ज्या खात्यामध्ये पैसे वळवण्यात आले त्या खात्यावर फसवणूक करून घेतलेली रक्कम शिल्लक असल्याचे दिसत होते. खात्याचा तपशील पोलिसांनी थेट रिझर्व्ह बँकेकडे पाठवला आणि पैसे काढण्याआधी ही खाती ब्लॉक करण्याची विनंती केली. त्यानुसार रिजर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार या बँक खात्यामधील व्यवहार बंद करण्यात आले. या तत्पर कारवाईमुळे पोलिसांना शहा यांचे १० लाख ७० हजार रुपये परत मिळवता आले.

मुंबई सायबर पोलिसांनी २०२०मध्ये अशाप्रकारे सुमारे १५ कोटी रुपये वाचविल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले. कुर्ला येथील एक महिला अंत्यविधीमध्ये असताना तिला एक फोन आला. बोलण्याच्या नादात तिने फोन करणाऱ्याला ओटीपी दिला आणि या महिलेच्या बँक खात्यातून पैसे वळविण्यात आले. मात्र या महिलेने विलंब न करता सायबर पोलिसांकडे धाव घेतल्याने तिचे आठ लाख पुन्हा मिळवता आहे. अमेझॉनमध्ये बक्षीस लागल्याचे सांगून अडीच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या महिलेलाही सुमारे दीड लाखाची रक्कम परत मिळवून देता आल्याचे करंदीकर म्हणाल्या.

‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा

फसवणूक झाल्यापासून वळते केलेले पैसे काढण्यापर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असतो. अपघाताप्रमाणे सायबर गुन्ह्यामध्ये हा गोल्डन अवर मानला जातो. वळवण्यात आलेले पैसे काढले नसतील तर ज्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आली ती गोठविण्यात येतात. तक्रार करणे, गुन्हा दाखल करणे या प्रक्रियेत वेळ घालविण्यापूर्वी बँक खात्याचा तपशील पोलिसांना द्यायला हवा.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here