वॉशिंग्टन: भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी देश असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेने केला आहे. अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर परराष्ट्र मंत्रालयाची नव्याने सूत्रे स्वीकारलेल्या टोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी प्रथमच दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या संभाषणात त्यांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले.

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी असून, या क्षेत्रात व अन्यत्र उभय देशांसमोर असणाऱ्या सामायिक आव्हानांचा कशाप्रकारे बिमोड करता येईल, तसेच या क्षेत्रातील नव्या संधी कशाप्रकारे साधता येतील, याविषयी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली, अशी माहिती अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस यांनी दिली. करोना लसीकरण, क्षेत्रीय विकास, द्विपक्षीय संबंधांत वाढ करण्यासाठीचे उपाय यावरही त्यांनी चर्चा केली.

वाचा:

ब्लिंकन यांनी ट्विटरवरूनही या चर्चेची माहिती दिली. जयशंकर यांच्याशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. परस्पर सहकार्यावर आम्ही दोघांनीही भर दिला, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले.

वाचा:

वाचा: पर्लप्रकरणी चिंता

अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या दहशतवाद्यांची या गुन्ह्यातील जबाबदारी निश्चित करण्यासंबंधी ब्लिंकन यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. आयएसआय व अल कायदा यांच्यातील संबंधांची एका बातमीसाठी माहिती गोळा करणाऱ्या पर्ल याची २००२मध्ये कराचीमध्ये निर्घृण हत्या झाली होती. पर्ल यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, याबाबत ब्लिंकन यांनी चिंता व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here