भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये वकिलीचं शिक्षण घेणारी तरुणी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे फिरायला गेली होती. त्या दरम्यान तिच्या बॅगमधून पेन ड्राइव्ह गायब झाला होता. त्या पेन ड्राइव्हमध्ये बॉयफ्रेंडसोबत तिचे काही आक्षेपार्ह फोटो होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने तिला आणि बॉयफ्रेंडला करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय विद्यार्थीनी काही दिवसांपूर्वी तरुणी आपल्या मित्रांसोबत दिल्लीला गेली होती. तेथून परतत असताना मथुराजवळ एका ढाब्यावर ते थांबले होते. त्यावेळी तरुणीच्या बॅगमधून पेन ड्राइव्ह गायब झाला होता. विद्यार्थ्यांचा ग्रुप तेथून दिल्लीत गेला आणि आत्यानंतर भोपाळला परतला. १५ जानेवारीला त्या तरुणीच्या फोनवर आरोपीने फोन केला. त्याचे बोलणे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

तिचे बॉयफ्रेंडसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने तिला दिली. त्यानंतर तो ब्लॅकमेल करू लागला. त्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केली. इतकेच नाही तर, तिच्याकडून बॉयफ्रेंडचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यालाही ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अखेर ब्लॅकमेलिंगला त्रासून तरुणाने भोपाळच्या बागसेवनिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here