दिल्लीत शेतकरी आंदोलनात २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला गेला. ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दुखी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांहून अधिक कळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण त्यावर तोडगा निघालेला नाही. अखेर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांना आवाहन केलं. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असल्याचं मोदी म्हणाले होते.
आजच्या ‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचार करणाऱ्यांना इशारा दिला आहे. लाल किल्ल्यावर झालेल्या राष्ट्रध्वजाच्या अपमानाने देश दुःखी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसंच शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि अनेक पावलं उचलत आहे. सरकारचे प्रयत्न सुरूच राहतील, असंही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. पण ‘मन की बातू’न पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनाचा कुठलाही उल्लेख केला नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times