ऐतिहासिक वास्तू असलेल्या मुंबई महापालिकेला पर्यटकांना भेट देता यावी म्हणून मुंबई महापालिकेने हे हेरिटेज वॉक सुरू केले आहे. यामुळे आता कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला या वास्तू पाहता येणार आहे. मात्र, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून महापालिकेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
एकीकडे हेरिटेज वॉक सुरु करुन ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केली. दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला ‘बाजारात’ उभी केलीत. अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच, असं म्हणत शेलार यांनी नीट काळजी घेताय ना?, कर्ज रोखेच विकताय ना?, ७/१२वर मालक मुंबईकरच राहणार ना?, असे सवाल उपस्थित केले आहेत.
वाचाः
मुंबई महापालिकेसाठी भाजपची तयारी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं आत्तापासूनच कंबर कसली आहे. पालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं मिशन मुंबईदेखील सुरु केलं आहे. तर, एकीकडे शिवसेनेनंही महापालिकेवरील सत्ता कायम राखण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times