अर्थसंकल्पाविषयी माहिती जाणून घेऊया.
१. अर्थसंकल्प म्हणजे काय ?– दरवर्षी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर केला जातो. येणाऱ्या वित्त वर्षासाठी सरकार उत्पन्न आणि खर्च याचा अंदाज बजेटमध्ये व्यक्त करते आणि त्यानुसार नियोजन करते. अगदी प्रत्येक कुटुंबाच्या दरमहा खर्चाचे (मासिक बजेट) ज्या प्रकारे नियोजन होते प्रमाणेच तशाच प्रकारे केंद्रीय अर्थसंकल्प तयार केला जातो.
२. अर्थसंकल्प कधी सादर करतात ?
– स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प वेगवेगळ्या तारखेला सादर करण्यात आला होता. कधी तो फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी सादर करण्यात येत होता. मात्र २०१७ पासून १ फेब्रुवारी या दिवशी ‘बजेट’ सादर करण्याचे निश्चित करण्यात आले.
३. कोण सादर करते ‘बजेट’ ?
– केंद्रीय अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडून संसदेत सादर केला जातो. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘बजेट’ सादर केले होते. येत्या १ फेब्रुवारी २०२० रोजी सीतारामन पुन्हा एकदा संसदेत केंद्र सरकारचे ‘बजेट’ सादर करणार आहेत.
४. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आला ?– आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी संसदेत स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला होता. पहिला अर्थसंकल्प हा केवळ भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा होता. यात कोणत्याही करवाढीची शिफारस करण्यात आली नव्हती.
५. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कधीपासून होते?अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाते. अर्थसंकल्पातील करबदल १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधी लागू होतात. भारतात १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times