म. टा. प्रतिनिधी, : पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू असून, राज्यातील एकही बालक लसीकरणापसून वंचित राहू नये, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी केले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती महिला रुग्णालयात बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बारामती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी यावेळी उपस्थित होते.


वाचाः

पवार म्हणाले, पुणे जिल्हयात या मोहिमेत सुमारे ११ लाख ३२ हजार ३५१ बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आज जिल्ह्यात ६ हजार ७०० बुथवर लसीकरण करण्यात येत आहे. ६ हजार २५४ पथकांच्या मदतीने गृहभेटी देत लसीकरण करण्यात येणार आहेत. त्यानुसार सरकारने नियोजन केले आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यातील अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here