म. टा. प्रतिनिधी, : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अकरा वर्षांच्या मुलाचा परिसरात रविवारी दुपारी मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या डोक्यात जखमा असल्यामुळे त्याचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
विश्वजीत वजारी (वय ११, रा. केळेवाडी, कोथरूड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. विश्वजीत हा २९ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विश्वजीत याचा कोथरूड पोलीस शोध घेत होते. रविवारी दुपारी त्याचा मृतदेह केळेवाडी परिसरातच आढळला. त्याच्या डोक्यात मारहाण केल्याचे दिसून आले आहे. त्याच्या डोक्यात जखमा असल्यामुळे त्याचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times