नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाला लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारावर रविवारी प्रथमच भाष्ट केलं. २६ जानेवारीला दिल्लीत राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान पाहून देश खूप दुःखी झाला, असं पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मध्ये म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर आता शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिला आहे. २६ जानेवारीला जे काही घडलं त्या मागे षडयंत्र होते. या प्रकरणी व्यापक चौकशी व्हायला हवी, असं नरेश टिकैत म्हणाले. देशाचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम आहे. आम्ही कधीही राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ देणार नाही. तो सदैव उंच ठेवू. पण हे सहन केले जाणार नाही, असं नरेश टिकैत म्हणाले. पीटीआयने हे वृत्त दिलंय.

‘सरकार किंवा संसदेला झुकू द्यायचे नये’
सरकार आणि शेतकर्‍यांमध्ये फक्त ‘एक फोन कॉल’ अंतर आहे, असं पंतप्रधान मोदींनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. यावर नरेश टिकैत यांनी उत्तर दिलं. सरकारने आमच्या लोकांना सोडले पाहिजे आणि चर्चेसाठी व्यासपीठ तयार केले पाहिजे. नक्कीच एखादा सुवर्णमध्य निघेल अशी आम्हाला आशा आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे सांगितले त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर करतोस त्याचा सन्मान करतो. सरकार किंवा संसदेनं आमच्यासमोर नतमस्तक व्हावं, अशी आमची इच्छा नाही. पण त्यांनी हे शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचेही रक्षण करावे, असं आवाहनही राकेश टिकैत यांचे बंधू नरेश टिकैत यांनी केलं.

सरकारने अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करावी. त्यानंतरच पुढील चर्चा होईल. पंतप्रधानांनी पुढाकार घेतला आहे आणि सरकार आणि आमचा दुवा बनले आहेत. शेतकऱ्याच्या पगडीचा सन्मान राहील आणि देशाच्या पंतप्रधानांताही, असं राकेश टिकैत म्हणाले. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

‘राष्ट्रध्वजाच्या अपमानाने देश दु:खी’

भारत आज जगातील सर्वात मोठी करोनावरील लसीकरण मोहीम राबवत आहे. पण प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान २६ जानेवारीला लाल किल्ल्यावरील घटनेमुळे देश खूप दु: खी झाला आहे. ‘मान की बात’ या रेडिओ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात साजरे करण्यात येणाऱ्या सण आणि उत्सवांचा संदर्भ पंतप्रधान मोदींनी दिला. या सर्वांच्या दरम्यान २६ जानेवारीला दिल्लीत तिरंग्याचा झालेला अपमान पाहून देश खूप दुःखी झाला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

२६ जानेवारील शेतकरी आंदोलनादरम्यान ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं. पोलिसांवर हल्ले झाले. दगडफेक करण्यात आली. ट्रॅक्टर अंगावर घालण्या प्रयत्न केला गेला. तसंच लाल किल्ल्यात घुसून आंदोलकांनी तेथील साहित्याची तोडफोड करत झेंडा लावला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here