मुंबई: राज्यात आज दिवसभरात एकूण ४० () बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ५८५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १ हजार ६७० रुग्ण करोनावर मात करून आज घरी परतले आहेत. काल प्रमाणे आज देखील नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी असल्याने चिंतेत काहीशी भरच पडली आहे. (total of 40 corona infected patients died in the state today)

तर, दुसरीकडे दैनंदिन रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा आता ४४ हजारांवरून ४५ हजाराच्या पुढे गेला आहे.

राज्यात आज दिवसभरात एकूण ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५१ हजार ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ५८५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १ हजार ६७० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख २९ हजार ००५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९५.१९ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४६ लाख १७ हजार १६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख २६ हजार ३९९ (१३.९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९० हजार २३२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार २९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला आहे. परवा ४३ हजार असलेली ही संख्या काल ४४ हजारांवर गेली होती. त्यात आज आणखी वाढ होऊन ही सख्या ४५,०७१ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक १३ हजार ८७२ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या ७ हजार ६९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५ हजार ८०० पर्यंत पोहोचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here