‘करोनाचा (Coronavirus) धोका अद्याप टळला नसल्याने शिवजयंतीला (Shiv Jayanti) शिवनेरी गडावर (Shivneri Fort) शिवभक्तांनी गर्दी करू नये. सॅनिटायझर, मास्कचा वापर आणि सुरक्षित वावर या त्रिसुत्रींचे पालन करून उत्सव साधेपणाने साजरा करावा’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. (devotees of should not crowd on on says district collector)
शिवनेरी गडावर होणाऱ्या शिवजयंती उत्सवाची जुन्नर नगरपालिका; तसेच बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग आणि पुरातत्त्व या विभागांनी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत गडावर करण्यात येणारी विद्युत व्यवस्था आणि रोषणाई, स्वच्छतागृहांची सुविधा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, हेलीपॅडची व्यवस्था याबाबतचा आढावा घेण्यात आला. बैठकीला आमदार अतुल बेनके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘करोनाचा धोका टळलेला नसल्याने शिवजयंतीला शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांनी थर्मल स्कॅनिंग करावे; तसेच सॅनिटायझर, मास्कचा वापर, सुरक्षित वावर याबाबतच्या नियमांचे पालन करावे’
क्लि करा आणि वाचा-
‘शिवजयंतीला दरवर्षी गडावर शिवभक्त हे शिवज्योत घेऊन येत असतात. त्यामुळे गडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी शिवज्योत घेऊन येणाऱ्या भक्तांना बनकर फाटा आणि आळे फाटा या ठिकाणी शिवज्योत उपलब्ध करून दिल्यास एकाच वेळी गडावर होणारी गर्दी टाळता येईल’ अशी सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times