तामिळनाडूने यावेळी नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार दिनेश कार्तिकचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. कारण तामिळनाडूने यावेळी बडोद्याच्या संघाला २० षटकांत १२० धावाच करु दिल्या. खासकरून तामिळनाडूचा फिरकीपटू मनिमरम सिद्धार्थने यावेळी भेदक गोलंदाजी केली. सिद्धार्थने यावेळी आपल्या चार षटकांत २० धआवा देत चार विकेट्स मिळवले आणि बडोद्याच्या संघाचे कंबरडे मोडले.
बडोद्याच्या डावाची सुरुवात यावेळी चंगली झाली नाही. कारण दुसऱ्याच षटकात बाबा अपराजितने निनाद राथवाला बाद करत बडोद्याला पहिला धक्का दिला. त्यानंतर बडोद्याचा कर्णधार केदार देवधरही बाद झाला आणि त्यानंतर बडोद्याचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सिद्धार्थने यावेळी केदारला बाद करत आपला पहिला बळी मिळवला.
बडोद्याची १ बाद २२ वरुन यावेळी ६ बाद ३६ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी बडोद्याचा संघ हा शंभर धावांचा टप्पा तरी ओलांडणार का, असा प्रश्न काही जणांनी पडला होता. पण त्यानंतर बडोद्याचा विष्णू सोळंकी हा संघासाठी धावून आला. सोळंकीला यावेळी अतित सेठची चांगली साथ मिळाली. सोळंकी आणि सेठ यांनी यावेळी सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळेच बडोद्याच्या संघाला १२० धावांपर्यंत मजल मारता आली.
सोनू यादवने यावेळी ही जोडी फोडली. सोनूने अतित सेठला बाद केले आणि ही स्थिरस्थावर झालेली जोडी फुटली. अतितने यावेळी ३० चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २९ धावा केल्या. सोळंकीचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. अखेरच्या षटकात मोठा फटका मारताना सोळंकी बाद झाला. सोळंकीने यावेळी ५५ चेंडूंत १ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४९ धावांची खेळी साकारली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times