पोलिसांकडून आंदोलकांना सतत शांततेचं आवाहन करण्यात येतं होतं. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. आंदोलकांनी लाल किल्ल्यात तोडफोड केली. यामुळे मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष दिसून आला. पोलिस, सीआरपीएफ आणि आरएएफचे जवान मोठ्या प्रमाणात जमलेल्या शेतकऱ्यांसमोर काहीही करू शकले नाहीत. आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह लाल किल्ल्यात प्रवेश केला.
आयटीओ जंक्शन हे दिल्लीच्या व्हीआयपी झोनपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी एका आंदोलकाचाही मृत्यू झाला. भरधाव ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर खाली येऊ त्याचा मृत्यू झाला. हा शेतकरी उत्तर प्रदेशातील रामपूरचा होता.
ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ३८ गुन्हे दाखल केले असून ८६ जणांना अटक केली. हिंसाचारात सामील असलेल्यांना ओळखण्यासाठी १७०० पेक्षा अधिक मोबाइल फोन व्हिडिओ क्लिप आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. आयटीओ परिसरात शेतकऱ्याच्या मृत्यूवरून चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आणि काही पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times