नवी दिल्ली: , ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
पाहुयात, आजच्या बंदबाबत क्षणोक्षणीचे अपडेट्स…

लाइव्ह अपडेट्स…>>पालघर: आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
>>पालघर: शहरात तणाव; कायदा सुव्यस्था प्रश्न उपस्थित झाल्याने उपविभागीय अधिकारी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात तैनात

>>
आजच्या बंदमध्ये आमचा सहभाग नाही: आनंदराज आंबेडकर
>>धुळ्यात बंदला हिंसक वळण; शिरपूर-पानसेमल बसवर आंदोलकांची दगडफेक

>>अहमदनगर: सावेडी उपनगरात बंदचा परिणाम नाही. व्यवहार सुरळीत सुरू

>>औरंगाबाद : अनेक ठिकाणी तिरंगा घेऊन निदर्शने

>> औरंगाबाद: खुलताबाद येथे पूर्णपणे बंद पाळण्यात आला आहे.

>> औरंगाबाद जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

>> मध्ये रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

>> ऐन गर्दीच्या वेळी झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

>> मुंबई: सीएए आणि एनआरसी विरोधात भारत बंदची हाक देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको केला.

>> बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here