म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यटन संचालनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त () जुन्नर येथे द्राक्ष महोत्सवाचे (Grape Festival) आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष बागेत जाऊन द्राक्षांचा आस्वाद घेता येणार आहे. पर्यटकांसाठी निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ()

करोनामुळे पर्यटन व्यवसायामध्ये अडचणी आल्या असताना, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याबाबत पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर- दातार म्हणाल्या, ‘द्राक्ष बागायतदारांच्या सहकार्याने हा महोत्सव होणार असून, त्यामध्ये पर्यटकांना प्रत्यक्ष बागेमध्ये जाऊन द्राक्षांचा आस्वाद घेता येणार आहे; तसेच वाइन कशी तयार करतात, याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल असणार असून, पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थ आणि वस्तूंची खरेदी करता येणार आहे’

क्लिक करा आणि वाचा-

‘महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेज येथील निवासस्थान आणि स्थानिक हॉटेल येथे पर्यटकांना सवलतीच्या दरात निवासाची व्यवस्था असणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये पर्यटकांनी सहभागी व्हावे’ असे आवाहन करमरकर-दातार यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here