म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

निवडणूक कोणतीही असो, विजयी झालेल्यांची मिरवणूक काढतात, सत्कार केले जातात. पराभूत झालेल्यांवर तोंड लपून बसण्याची वेळ येते. मात्र, कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. आदर्शगाव पाटोद्याचे मुख्य प्रवर्तक भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते या पराभूत उमेदवारांना उमेद पुरस्कार देऊन पुन्हा लढ्याचे बळ देण्यात आले.

येथे अपना परिवार संस्थेच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते व आपणा परिवार अध्यक्ष राजेंद्र गोरे यांची होती. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचा पेरे पाटील यांच्या हस्ते उमेद हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. पेरे पाटील यांच्या मुलीचाही त्यांच्या गावात पराभव झाला आहे. त्यांच्या या परभवाची मोठी चर्चा झाली होती. त्यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून संयोजकांनी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले, ‘पराभुत उमेदवारांचा सत्कार करणारे मिरजगाव हे देशातील पहिलेच गाव असावे. मी आजपर्यंत खूप कार्यक्रमांना उपस्थिती लावली परंतु निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचा सत्कार करणे ही कल्पना आणि हा कार्यक्रम मी आजपर्यंत पाहिला नाही. यापुढे मी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जाईल त्या ठिकाणी मिरजगावच्या उपक्रमाचे नाव निश्चितपणे घेईल. राजकारणात ठराविक वेळेनंतर निवृत्त होऊन तरुणांना संधी देणे काळाची गरज आहे. सध्या कोणाची जिरवायची किंवा प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढवायची अशी पद्धत पडली आहे. त्यासाठी मतं विकत घेतली जातात. अशी लोकशाही घातक आहे. या पार्श्वभूमिवर हा लोकशाही जिवंत असल्याचा पुरावा आहे, असे मी मानतो,’ असेही पेरे पाटील म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण शिंगवी होते. मिरजगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील पराभूत उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here