म. टा. विशेष प्रतिनिधी,

लोकलसेवा आज, सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू होत असल्या तरीही गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संसर्ग फैलावणार नाही याची योग्य प्रकारे खबरदारी घेऊन प्रवास करणे गरजेचे आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी ई पास वा तिकीट काढा, तसेच सोबत तीन प्लाय फेस मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, निर्जंतूक वाइप्स ठेवा, मासक बदलण्याची गरज लागल्यास बॅगेत अतिरिक्त मास्कसोबत ठेवा, घराबाहेर पडण्यापूर्वी शक्य असतील तर ग्लोव्ह्ज घाला. प्रवास सुरू करण्‍यापूर्वी साबण व पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा आणि त्‍यानंतर मास्‍क घाला. मास्‍क घातल्‍यानंतर संबधित ठिकाणी पोहोचेपर्यंत मास्कला स्पर्श करू नका किंवा मास्क काढू नका, असा सल्ला इंटेन्सिव्हिस्ट डॉ. संदीप पाटील यांनी दिला आहे. (Mumbai Local Trains Travelling)

सुरू झाल्यामुळे मास्क घालायची गरज नाही या भ्रमामध्येही अनेकजण आहेत. मास्क खाली घेणे, फोनवर बोलताना मास्कचा वापर न करणे, गुटखा, पान-तंबाखूसदृश्य पदार्थ खाऊन थुंकणे हे प्रकार आता थांबायला हवेत, त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. सार्वजनिक स्वच्छतेचे आरोग्यसंस्काराचा अभाव असल्यामुळे करोनासारख्या संसर्गाचा मुकाबला आपल्याला करावा लागला, हे आता लक्षात घ्यायला हवे, त्यादृष्टीने सार्वजनिक वर्तन ठेवायला हवे असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. एम. एम. मुकणे यांनी स्पष्ट केले.

हे लक्षात ठेवा

किमान सहा फूट अंतरावर उभे राहा आणि समूहांमध्‍ये गर्दी करणे टाळा.

रेल्‍वेने कुठे उभे राहावे किंवा बसावे, कुठे रांगेत उभे राहावे आणि बाहेर पडण्‍याचा मार्ग यासंदर्भात चिन्‍हे तयार केली आहेत, त्‍या चिन्‍हांचे पालन करा.

तिकीट मशिन, हँडरेल्‍स, एलिव्‍हेटर बटण अशा पृष्‍ठभागांना स्‍पर्श करणे शक्‍यतो टाळा. तुम्‍ही या पृष्‍ठभागांना स्‍पर्श केला तर त्‍वरित साबण किंवा पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा किंवा ६० टक्‍के अल्‍कोहोल असलेल्‍या सॅनिटायझरचा वापर करा.

सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्‍यानंतर किमान २० सेकंद साबण व पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा.

कृपया मास्क घाला

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व कचरा करणे टाळा.

प्रवासामध्ये ज्यांनी मास्कचा वापर केला नसेल, त्यांना स्मरण करून द्या.

प्रवास पूर्ण केल्‍यानंतर हात सॅनिटाइज करा.

कामाच्‍या ठिकाणी पोहचल्‍यानंतर किमान २० सेकंद साबण व पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा.

प्रवासादरम्‍यान घातलेला मास्‍क काढून टाका आणि त्‍याऐवजी नवीन मास्‍कचा वापर करा.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here