महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पुढील महिन्यांमध्ये अयोध्येचा दौरा आयोजित केला असून, या दौऱ्याच्या आधीच विश्व हिंदू परिषदेचे काही नेते राज यांची भेट घेणार आहेत. प्रभू रामचंद्र मंदिराच्या निधी संकलनाचा कार्यक्रम परिषदेने हाती घेतला असून त्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे समजते.
राममंदिराच्या निधी संकलनाचा कार्यक्रम सध्या आणि भाजपसारख्या संघटना राज्यात राबवत असून वेगवेगळ्या संस्था ट्रस्ट यांच्या माध्यमातून दानशूर लोकदेखील मंदिराच्या उभारणीसाठी लाखो रुपयांचा निधी देत आहेत. या मंदिराच्या उभारणीच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदमधील प्रांतसंघटन मंत्री अनिरुद्ध देशपांडे, सहमंत्री श्रीराज नायर हे सोमवारी १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता राज यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रचार-प्रसार विभागाचे कोकण प्रांत प्रशांत पळ यांनी दिली.
वाचा:
विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाचे काम सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे यांची भेट असून मनसेच्या वतीने देखी भविष्यात वेगवेगळ्याा ठिकाणी निधी संकलन करणे, तसंच हिंदू मुद्द्यांवरून सहकार्य करणे, अशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times