प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकारने सहा वर्षांची योजना तयार केली आहे, असे सीतारामन यांनी आज सांगितले. त्या म्हणाल्या की नॅशनल हेल्थ मिशनला यामुळे फायदा होईल. या योजनेत ग्रामीण भारतात १७००० आणि शहरी आणि निमशहरी भागात ११००० नवीन आरोग्य सेवा केंद्र उभारली जातील.
आरोग्य सेवा केंद्र आणि लॅब यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक लॅब उभारन्ह्यात येईल, असे त्यांनी सांगितले. देशात सध्या दोन करोना प्रतिबंधात्मक लसीना मान्यता मिळाली आहे. लवकरच आणखी दोन करोना प्रतिबंधात्मक लशी तयार होतील, असे त्यांनी सांगितले.
करोना विषाणूने केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील आरोग्य सेवेची परीक्षा घेतली. आरोग्य सेवा क्षेत्रातील कमतरता करोना संकट काळात समोर आल्या. त्यामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात मोठी गुंतवणूक आवश्यक होती. आगामी अर्थसंकल्पात आरोग्य सेवेतील तरतूद वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. करोनासारख्या महामारीशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज रहावी यादृष्टीने सरकार बजेटमध्ये विचार केल्याचे दिसून आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times