रविंद्रनाथ टागोर यांच्या ओळीचा उल्लेख
भाषणाच्या सुरुवातीलाच अर्थमंत्र्यांनी नोबेल पुरस्कार विजेते साहित्यकार आणि कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका वाक्याचा उल्लेख केला. कोविड महामारीशी भारताच्या लढाईचा उल्लेख करताना ‘मी रविंद्रनाथ टागोर यांच्या एका ओळीचा उल्लेख करू इच्छीते… विश्वास ही अशी गोष्ट आहे जी सकाळच्या अंधारातही उजेडाची जाणीव करून देते (‘Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark)’ असं अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटलं. ‘इतिहासात हा क्षण एका नव्या युगाची सकाळ आहे. ज्यात भारत आशेचा किरण बनण्याकडे वाटचाल करत आहे’ अशी पुश्तीही अर्थमंत्र्यांनी जोडली.
पाच राज्य-केंद्रशासित प्रदेशांत निवडणूक
२०२१ साली पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी आणि आसाम या राज्य-केंद्रशासित प्रदेशांत होणार आहेत. आणि आसाम या राज्यांत मात्र केंद्रातील सत्ताधारी भाजपला कडव्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे.
पंतप्रधान मोदींचं कौतुक
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लॉकडाऊनमध्ये घेतलेल्या निर्णयांचाही उल्लेख केला. ‘हा अर्थसंकल्प अशा परिस्थितीत तयार करण्यात आला आहे जी परिस्थिती आत्तापर्यंत पाहायला मिळाली नव्हती. २०२० मध्ये आपण कोविड १९ सोबत काय काय सहन केलं त्याचं उदाहरण नाही. पंतप्रधानांकडून २.७६ लाख कोटी रुपयांची पंतप्रधान गरीब कल्याण योजना घोषित करण्यात आली. सोबतच ८०० दशलक्ष लोकांना मोफत खाद्यान्न उपलब्ध केलं. पंतप्रधानांनी ८० दशलक्ष कुटुंबांना अनेक महिन्यांपर्यंत मोफत गॅस उपलब्ध करून दिला. ४० दशलक्षहून अधिक शेतकरी, महिला, गरीबांना थेट आर्थिक मदत पुरवली’ अशी आठवणही यावेळी निर्मला सीतारमण यांनी करून दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times