यापूर्वी २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी, १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. त्यामुळं ही परिषद वादग्रस्त ठरली होती. पोलिसांनी या परिषदेचा संबंध कोरेगावच्या हिंसाचाराशी जोडला होता. त्यातून परिषदेशी संबंधित अनेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.
वाचा:
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या परिषदेला परवानगी मिळणार का याकडं लक्ष लागलं होतं. सुरुवातीला पोलिसांनी परिषदेला परवानगी नाकारली होती. मात्र, आंदोलकांनी कोणत्याही परिस्थिती परिषद भरवण्याचा पवित्रा घेतल्यानंतर परवानगी देण्यात आली. त्यानुसार ३० जानेवारी रोजी ही परिषद पार पडली. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, लेखिका आदी वक्त्यांची प्रखर भाषणे झाली. या संदर्भात बोलताना गृहमंत्री देशमुख यांनी एल्गार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ मागवला असल्याचं स्पष्ट केलं.
वाचा:
‘एल्गार परिषदेचा व्हिडिओ मागवला आहे. त्यातील भाषणांची चौकशी करू. त्यात काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेली आहेत का, याची तपासणी केली जाईल. काही आक्षेपार्ह आढळल्यास पुढील कारवाई होईल. मात्र तपास होईपर्यंत त्याबद्दल अधिक काही सांगता येणार नाही, असं अनिल देशमुख म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times