मुंबईः ‘अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण बजेटचा भार महाराष्ट्रावर अवलंबून आहे. पण, बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीही विशेष तरतूद नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून राज्याची निराशा झाली असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसंच, आता आर्थिक थापा बंद करायला हव्यात, अशी टीकाही त्यांनी केली आहे

‘महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहेत. आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहे आणि किती खोटे? हे सहा महिन्यात कळेल,’ असा टोला राऊतांनी लगावला आहे.

वाचाः

‘आज सादर झालेले बजेट देशाचे होते की पक्षाचे होतेय़ पक्षाचं निधीवाटप सुरु आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. शिवाय, पेट्रोल डिझेलवर लावलेल्या कृषी अधिभारावरही राऊतांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. अधिभार लावून त्यांना पेट्रोल- डिझेल हजार रुपये करायचे आहे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

वाचाः दरम्यान, अर्थसंकल्पात मोदी सरकारची नजर आगामी विधानसभा निवडणुकांकडेही असल्याचं दिसून आलं. पश्चिम बंगालच्या रस्त्यांसाठी २५ हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, देशातील रस्त्यांसाठी १ लाख १८ हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्यातील २५ हजार कोटी केवळ पश्चिम बंगालमधील रस्त्यांसाठी वापरण्यात येणार आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here