मुंबई: करोना विषाणूवर लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना केंद्राच्या आजच्या अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे,’ अशी जळजळीत प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. ( reaction on )

वाचा:

केंद्रीय अर्थमंत्री यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते करोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांना या बजेटनं निराश केलं आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा कायम आहे. महिलांसाठी कुठलीही भरीव तरतूद नाही. करदात्यांना कुठलाही दिलासा नाही. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर यावेळीही अन्याय झाला आहे. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वाचा:

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांबाबतही अर्थमंत्री बोलल्या. क्रिकेटचा सामना नशिबानं साथ दिल्यास एकवेळ जिंकता येतो, परंतु देशाच्या अर्थसंकल्पारखी गोष्ट नशिबावर सोडून चालणार नाही, हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी समजून घ्यायला हवं होतं. केंद्रीय अर्थसंकल्प हे आत्मनिर्भर बजेट असल्याचा ट्रेंड ट्विटरवर चालवला जातोय, परंतु हे आत्मनिर्भर नव्हे तर देशाला बरबादीकडे नेणारं अस्ताव्यस्त बजेट असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

वाचा:

‘आयएएनएस-सी व्होटर बजेट ट्रॅकर’च्या सर्वेक्षणातून केंद्र सरकारची आर्थिक कामगिरी आजवरची सर्वात वाईट असल्याचं समोर आलं आहे. महागाईमुळं बहुतांश जणांना खर्चाचा ताळमेळ राखणं कठीण झालं असल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेले दावे हे स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे आहेत, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ‘आत्मनिर्भर भारत योजनेसाठी जीडीपीच्या १३ टक्के निधी खर्च करण्याचे जाहीर केले आहे, यातला किती निधी नेत्यांच्या प्रसिद्धीवर खर्च होणार आणि किती लाभार्थींना मिळणार हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं, अशी खोचक टिप्पणीही अजितदादांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here