वाचा:
केंद्रीय अर्थमंत्री यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केले. हा अर्थसंकल्प म्हणजे फुगा असून टाचणी लागली की तो फुगा फुटणार. करोना काळात जाहीर केलेले दहा लाख कोटींचे पॅकेज कुठे गेले हे जसे कोणालाच कळले नाही तसेच या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रकमा कुठे गेल्या हेही कोणालाच कळणार नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. हा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांसाठी आहे असे वाटत नसून काही विशिष्ट उद्योगपतींसाठी हा अर्थसंकल्प आहे, यात शंका नाही, असा थेट हल्ला जयंत पाटील यांनी सरकारवर केला.
वाचा:
महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. नागपूर, नाशिक व पुण्याच्या मेट्रोसाठी केलेली तरतूद नाममात्र आहे. याउलट पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आल्याने तिथे रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी भरपूर पैसे देण्यात आलेले आहेत. आमच्याही राज्यात रस्ते खराब आहेत. भारत सरकारचा पैसा वापरून भाजपाला पश्चिम बंगाल मधील निवडणुका जिंकायच्या आहेत असे दिसते, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. आपलं आहे, सरकारी आहे त्याला मदत करण्याऐवजी कॉर्पोरेट क्षेत्राला १ लाख ४५ हजार कोटीची मदत मोदी सरकारने दिली आहे. करांच्या पद्धतीत देखील कोणतेही आमूलाग्र बदल करण्यात आलेले नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले.
वाचा:
बोलायचं एक आणि करायचं एक अशी पद्धत हे सरकार अवलंबत आहे. मोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात काहीच नाही अशी पद्धत भाजपची आहे अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली. या अर्थसंकल्पात संरक्षणावर किती मदत देणार हे निर्मला सीतारामन यांनी सांगितले नाही कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखी आकडेवारी नसणार, असा टोला लगावतानाच सरकार संरक्षण तरतुदीवर बोलत नाही याचा अर्थ सरकार सुरक्षितेबाबत गंभीर नाही, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
वाचा:
बेरोजगारी कशी कमी करणार, याचे उत्तर मिळालेले नाही. महागाई नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. महागाईचे दर नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे याचेही उत्तर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिलेले नाही, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात २०१९-२० मध्ये जीएसटीचे १ लाख ८५ हजार कोटी रुपये गोळा झाले. त्यामुळे राज्य सरकारला काही मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, मोदी दुसऱ्या राज्यांना देत आहेत. यांनी महाराष्ट्राला देऊ नका असे सांगितले आहे का? असा सवाल करतानाच अशी कोतेपणाची मानसिकता चांगली नाही, असा जोरदार हल्ला जयंत पाटील यांनी केला. देश एकसंघ ठेवायचा असेल तर निधीत दुजाभाव चालणार नाही. असा दुजाभाव केल्यास देश एकसंघ राहताना दिसणार नाही. निधी वाटपात भेदभाव करून सरकार देशाच्या एकसंघतेला धक्का पोहचवत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
पुढचा अर्थसंकल्प OLX वर मांडावा लागेल!
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प टॅबवर मांडला गेला, पण पुढचा अर्थसंकल्प ओएलएएक्स ( OLX ) वर मांडावा लागेल. कारण हे केंद्र सरकार ‘सब बेच दो’ या मानसिकतेचं आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांना विशेष सवलती जाहीर केल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षात या राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. म्हणजे अर्थसंकल्पाच्या आडून भाजपाने या राज्यांचा वचननामा जाहीर केला आहे का?, असा सवालही पाटील यांनी केला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
1pediatric
coursework university coursework ucl courseworks help coursework cover page
coursework on a resume coursework help coursework masters coursework in marketing
coursework utd coursework at a college or university coursework vs thesis masters coursework geography
coursework uk coursework samples coursework deutsch online coursework
coursework vs exams coursework high school online coursework coursework umich stats
coursework history
[url=”https://brainycoursework.com”]coursework papers[/url]
coursework plagiarism checker
coursework cover page buy coursework coursework download free courseware ku