मुंबईः वादग्रस्त ट्विट आणि बेधडक वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ गीतकार यांची बदनामी केल्या प्रकरणी कंगना राणावतला अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले आहेत. याविषयी १ मार्चला सुनावणी होणार आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगना राणावतनं जावेद अख्तर यांना या प्रकरणात ओढत अनेक गंभीर विधानं केली होती. याबाबत अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होती. आज या प्रकरणी पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केला आहे.

कंगनाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करून अख्तर यांची बदनामी केल्याच्या आरोपांत तथ्य आढळल्याने कंगनाची अधिक चौकशी करण्याची आवश्यक आहे, असा अहवाल पोलिसांनी आज सादर केला. त्यानंतर न्यायालयानं कंगनाला समन्स बजावून १ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे.

वाचाः

कंगना मुलाखतीत काय म्हणाली होती?

कंगनाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलीवूडवर गंभीर आरोप केले होते. घराणेशाहीमुळे बॉलीवूडची वाट लागली आहे. बॉलीवूडमध्ये माफियाराज पसरले आहे, असा आरोप कंगनाने केला होता. त्यात दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांच्यावरही तिने गंभीर आरोप केले होते. ऋतिक रोशन आणि यांच्यात मोठा वाद भडकला होता. या प्रकरणात बोलू नये म्हणून अख्तर यांनी माझ्यावर दबाव टाकला. मला ऋतिक व त्याच्या कुटुंबीयांची माफी मागायला सांगितले. तसे केले नाही तर तुला ते जेलमध्ये टाकतील, अशी दमदाटी अख्तर यांनी केल्याचे कंगनाने मुलाखतीत जाहीरपणे सांगितले होते. कंगनाची बहिण रंगोली हिनेसुद्धा सोशल मीडियावर असेच आरोप केले होते. त्यामुळेच अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे.

वाचाः

आणखीही गुन्हे दाखल

दरम्यान, कंगना विरुद्ध मुंबईतील हे काही एकमेव प्रकरण नाही. याशिवाय आणखीही गुन्हे तिच्याविरुद्ध दाखल आहेत. वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना व तिच्या बहिणीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here