मुंबईः आज राज्यात ३ हजार २८९ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून राज्यातील रिकव्हरी रेट ९५. २६ टक्के इतके झाले आहे. तसंच, राज्यात फक्त ४३ हजार ७०१ अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा आकडा खाली येत असल्यानं हा राज्यासाठी मोठा दिलासा आहे. ()

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढत असतानाच आज करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर, राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येचा आकडाही झपाट्याने खाली येत आहे. हे एक प्रकारे राज्यातील आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं चित्र आहे. सध्या राज्यात ४३ हजार ७०१ अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.

वाचाः

आज राज्यात ३ हजार २८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात, आजपर्यंत एकूण १९ लाख ३२ हजार २९४ करोना बाधित रुग्ण उपचारांनंतर घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ९५. २६ टक्के इतके झाले आहे. तर, आज १ हजार ९४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णसंख्या २० लाख २८ हजार ३४७ इतके झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ९२ हजार ३८२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार १५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचाः

आज राज्यात २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण करोनामृतांची संख्या ५१ हजार १०९ इतका झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४६ लाख ५६ हजार २२३ चाचण्यांपैकी २० लाख २८ हजार ३४७ इतके नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचाः

अॅक्टिव्ह रुग्ण
मुंबईत सध्या ५ हजार ६५८ रुग्ण उरले आहेत. तर, ठाण्यात ७ हजार ४४०, पुण्यात सर्वाधित १३ हजार ४८७ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here