म.टा. प्रतिनिधी, नागपूर

आर्थिक विवंचनांना कंटाळूनच नारनवरे कुटुंबाने () वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या () केल्याचे समोर आले आहे. मात्र, इतक्या आर्थिक समस्यांना तोंड देतानासुद्धा त्यांनी सगळ्यांची देणी चुकती करूनच आपले आयुष्य संपविले. शनिवारी पगार झाल्यावर श्याम नारनवरे यांनी तातडीने किराणा, भाजीवाला, दुधवाला अशा सगळ्यांची देणी चुकती केली. त्यानंतरच त्यांनी स्वत:चे व कुटुंबाचे आयुष्य संपविले.

श्याम गजानन नारनवरे (वय ४६), त्यांच्या पत्नी सविता (वय ३५) व मुलगी समता (वय १२, तिन्ही रा. अनमोलनगर, वाठोडा) यांनी वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी दुपारी समोर आले. पोलिसांनी या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला. सविता दीर्घकाळापासून आजारी होत्या. श्याम यांची मिळकतही फारशी नव्हती. त्यांचा बराचसा पगार पत्नीच्या आजारावरच खर्च होत. यामुळे, ते आर्थिक विवंचनेत होते. शनिवारी दुपारी श्याम यांचा पगार झाला. त्यानंतर सगळ्यांची देणी चुकती करून तिघेही मोटरसायकलने अंभोऱ्याकडे गेले. त्यांनी तेथे कच्चा चिवडा खाल्ला. अखेरचा नाश्ता सोबत करून तिघांनी एकत्रित जगाचा निरोप घेतला.

जाऊ तर तिघेही

गेल्या काही काळात श्याम खचल्याचे जाणवत होते, असे त्यांच्या जवळच्या काही मित्रांनी पोलिसांना सांगतिले. तसेच ते आपल्या मित्रांजवळ आत्महत्येबाबत बोलून दाखवायचे. ‘जाऊ तर आम्ही तिघेही जाऊ,’ असे ते बोलत असत.

क्लिक करा आणि वाचा-

तुम्ही सोने वाटून घ्या
श्यामसह सवितासुद्धा वैफल्यग्रस्त झाल्या होत्या. ‘आमचे सोने तुम्ही दोघी मिळून वाटून घ्या,’ असा सल्ला त्या श्याम यांच्या सख्ख्या बहिणींना देत असत. आत्महत्येपूर्वी त्यांनी तिघांच्या अंगावरील सोन्याचे सगळे दागिने काढून घरीच ठेवले. यावरून त्यांनी सोने नातेवाईकांसाठी सोडल्याचे लक्षात येते. श्याम यांच्या बहिणींनी नारनवरे दाम्पत्याला अनेकदा आधार देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तो अपयशी ठरला.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here