नागपूर: राज्यातील रुग्णालयांमधील उपचाराचा स्तर दिवसेंदिवस खालावतो आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूदरातही वाढ झाली आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक रिट याचिका जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील निवासी यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांचे पती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. २ जून २०१६ रोजी एका विवाह समारंभातून परत येताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना काटोल येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना काटोल येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारांसाठी हलवण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याने ममता कटरे यांना जबर धक्का बसला.

कुटुंबीयांनी व्यवस्थापनावर उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप करून याबाबत पोलिसांत तक्रार दिली. पण, पोलिसांकडून कोणतीच कठोर कारवाई झाली नाही. अखेर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यातील उपचारपद्धती खालावत आहे. यामुळे रुग्ण मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्याच्या अंमलबजावणीतही त्रुटी आहेत. त्याशिवाय राज्य सरकार व सेंटर फॉर इन्क्वायरी इंटू हेल्थ अॅण्ड अलाइड थीम्स यांनी मिळून उपचारासाठी काही नियमावली तयार केली होती. त्या नियमांचेही पालन होत नाही, असे अनेक मुद्दे या याचिकेद्वारे मांडण्यात आलेत. याचिकाकर्त्यांकडून अॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here