देशपातळीवर आंदोलन सुरु असतांना त्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारने () सादर केलेला अर्थसंकल्प () हा शेतकऱ्यांसाठी खूप काही देण्यात येईल अशी अपेक्षा होती. अर्थसंकल्पाचा ४० टक्के भाग हा शेतकऱ्यांना असेल असे वाटत होते. मात्र, या अर्थसंकल्पाने देखील शेतकऱ्यांना निराश केले आहे. शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्याची सुसंधी केंद्र शासनाने घालवली असल्याचा प्रतिक्रीया जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. ( have reacted that this years )
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्प आज जाहीर केला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सरकार काय घोषणा करते याची उत्सुकता सर्वाना होती. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी भरीव योजना जाहीर करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. असे असले तरी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यावर प्रतिक्रीया जाणून घेतल्या असता, शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून फारसे काही हाती लागणार नसल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मते, अर्थसंकल्पात करण्यात आलेली दीडपट हमीभाव ही घोषणा म्हणजे पुन्हा शेतकऱ्यांना दिलेले गाजर आहे. घोषणा करणे सोपे आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्याची कसरत असते. मुळात हमी भाव हाच सदोष आहे. त्यामुळे तो दिडपट करुन देखील उपयोग होणार नाही.यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काय येणार नाही ? पैसे कुठून येणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.
क्लिक करा आणि वाचा-
अर्थसंकल्पात भरीव काही तरी हवे होते. दिडपट हमीभावाने शेतकऱ्यांच्या खर्च व उत्पादन खर्चातील तफावत भरुन निघणार नाही. शेतकऱ्यांना दोनपट हमीभाव दिला तरी देखील तो परवडलेच असे नाही. गहु उत्पादक शेकऱ्यांप्रमाणेच कापूस, केळी उत्पादक शेतकऱ्यांठी देखील भरवी तरतुद अपेक्षित होती. मात्र, तसे न झाल्याने खान्देशातील शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाल्याचा भावना जळगाव जिल्ह्यातील कीशोर पाटील, सतिष चिरमाडे व संदीप नारखेडे या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times