म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा खून प्रकरणातील () मुख्य आरोपी पत्रकार (Bal Bothe) याचा अटकपूर्व अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्यासमोर या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तो फेटाळून लावला. आता पोलिसांना शरण येणे किंवा सर्वोच्च न्यायायात धाव घेणे हे दोन पर्याय आरोपीसमोर असू शकतात.

या गुन्ह्यात सुमारे दोन महिन्यांपासून आरोपी बोठे फरारी आहे. मधल्या काळात त्याच्यावतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे ३१ डिसेंबरलाच त्याच्यावतीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सुनावणीसाठी तो १८ जानेवारीला आला. त्या दिवशी आरोपीच्या वकिलांनी मुदत वाढवून घेतल्याने १ फेब्रुवारीला सुनावणी ठेवण्यात आली होती. सरकारतर्फे अड. व्ही. एस. बडाख यांनी काम पाहिले. आज दुपारच्या सत्रात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळत असल्याचे जाहीर केले. यासंबंधीचा लेखी आदेश सायंकाळपर्यंत प्राप्त होऊ शकेल. आरोपीविरूदध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. गुन्हा घडल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत आहे, त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारीपक्षातर्फे करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या जरे यांचा ३० नोव्हेंबरला सायंकाळी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून खून झाला होता. सुरवातीला हे प्रकरण गाडीला कट मारल्याच्या कारणातून झाल्याचे पुढे आले होते. मात्र, त्यानंतर हा कट रचून, सुपारी देऊन करण्यात आलेला खून असल्याचे तपासात उघड झाले. पत्रकार बोठे याचे मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आले. त्याच्याविरूद्ध पोलिसांना पुरावेही मिळाले. मात्र, अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली. त्याच्याविरूद्ध स्थायी वॉरंटचा आदेशही पोलिसांनी मिळाली. मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. तरीही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

क्लिक करा आणि वाचा-

उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणे किंवा पोलिसांना शरण येणे असे दोन पर्याय आरोपीसमोर असू शकतात. मात्र, एवढे होऊनही पोलिस आरोपीला अटक करू न शकल्याने पोलिसांचीही नाचक्की होत आहे. नगरच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या. जरे कुटुंबियांकडून यासंबंधी मोठा पाठपुरावा करण्यात येत आहे. उच्च न्यायालयातही मूळ फिर्यादीतर्फे वकिलाची नियुक्ती करण्यात आली होती.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here