लेफ्टनंट जनरल (JS Nain) यांनी पुण्यातील दक्षिण कमांड मुख्यालयाचा कार्यभार स्वीकारला. लष्कराच्या पुणेस्थित दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदाचा कार्यभार लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी सोमवारी स्वीकारला. (JS nain took charge of the south command headquarters in )
राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा सैनिकांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर दक्षिण मुख्यालयात त्यांना‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. ले. जनरल जे. एस. नैन हे कुंजपुरा सैनिक शाळेचे व पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी छात्र आहेत. जून १९८३ मध्ये त्यांची डोगरा रेजिमेंटमध्ये नेमणूक झाली. त्यानंतर लष्करात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times