नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( ) यांनी आज सादर केलेल्या बजेटमध्ये ( ) कृषी अधिभाराची घोषणा केली. या अतिरिक्त कर भाराने मद्य, काबुली चणे, मटार, मसूर डाळ, पेट्रोल यावर कृषी अधिभार लावण्यात येणार आहे. यामुळे एप्रिलपासून या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोमवारी संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. यात आयकर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे करदात्यांची घोर निराशा झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सीमा शुल्कात जवळपास ४०० हून अधिक सवलतीबांबत सरकार विचार करत आहे. त्याशिवाय स्टील उत्पादनांवरील शुल्क कपात करण्यात आली आहे. याशिवाय तांब्याचे भंगारवरील शुल्क ५टक्क्यावरून २.५ टक्के केले आहे. मोबाईलच्या काही स्पेअरपार्टवर यंदा बजेटमध्ये शुल्क लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मोबाईलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

सीतारामन यांनी काही वस्तूंवर कृषी अधिभार लावण्याची घोषणा केली आहे.

या वस्तू महागणार

– कॉटन, सिल्क, प्लास्टिक
– लेदर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वाहनांचे सुटे भाग
– सौर उत्पादने, मोबाईल, चार्जर, इंपोर्टेड कपडे
– रत्ने, एलईडी बल्ब,
– रेफ्रिजरेटर एसी
– मद्य

या वस्तू होणार स्वस्त

– नायलॉन कपडे , लोखंडी वस्तू
– स्टील, तांब्याच्या वस्तू,
– सोने , चांदी
– प्लॅटिनम

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here