या कामांतर्गत अंधेरी पूर्वेकडील एन. एस. फडके मार्गावर हॉटेल रिजन्सीनजीक महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीची १,३५० मिलीमीटर व्यासाची वांद्रे ऑऊटलेट जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच १२०० मिलीमीटर व्यासाची पार्ले आऊटलेट ही जलवाहिनीचे काम देखील करण्यात येणार आहे. याबरोबच चकाला केबिन येथील १,३५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर असलेली ९०० मिलीमीटर व्यासाची झडप देखील बदलण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू करण्यात येणार आहे. हे काम दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी साडेसहापर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान पश्चिम उपनगरातील काही भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
‘या’ भागांत होणार पाणीपुरवठा खंडीत
सांताक्रूझ पश्चिम
खार पश्चिम
विलेपार्ले पूर्व
विलेपार्ले पश्चिम
विलेपार्ले पूर्वेकडील देशांतर्गत विमानतळाचा संपूर्ण परिसर
सहार मार्ग
एन. एस. फडके मार्ग
ए. के. मार्ग
गुंदवली गावठाण
तेली गल्ली
साईवाडी
जुहू कोळीवाडा
जुहू कोळीवाड्यातील मांगेलावाडी
‘या’ भागांत होणार कमी दाबाने पाणी पुरवठा
आगरीपाडा
गोळीबार
प्रभात वसाहत
वाकोला विभाग
डवरीनगर
कलिना
सीएसटी मार्ग
कलिना डोंगर
सुंदरनगर
कलिना गाव
कोलिव्हरी गाव
जांभळीपाडा
शास्त्रीनगर
वांद्रे पश्चिम
मोगरापाडा
एस व्ही मार्ग
गिलबर्ट हिल
चार बंगला
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times