मुंबई : दादर चौपाटीवरील (Dadar Chowpatty) दर्शक गॅलरीसाठी () कंत्राटदार नेमण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला असून या कामासाठी एकूण साडेचार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. आठ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे आता लवकरच लोकांना या गॅलरीत उभे राहून समुद्राची भरती-ओहोटी न्याहाळता येणार आहे. त्याच प्रमाणे वरळीपासून थेट वांद्र्यापर्यंतचा समुद्रकिनारा मुंबईकरांना पाहता येणार आहे. (a spectator gallery will soon be set up at )

ही दादर चौपाटीवर चैत्यभूमीच्या मागच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात येणार आहे. पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने हे काम करण्यात येणार आहे. दादर परिसरात पूर्वी असलेल्या कापड गिरण्यांमधील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी ज्या ठिकाणी जलवाहिनी मिळते त्या ठिकाणी ही गॅलरी बांधण्यात येणार आहे. सध्या गिरण्या बंद पडलेल्या असल्यामुळे ही जलवाहिनीचा वापर होत नाही. दादर चौपटीला भेट देणारे अनेक नागरिक या जलवाहिनीवर बसतात. येथे सेल्फी घेतात, फोटो काढतात. त्यामुळे याच जागी दर्शक गॅलरी उभारणे संयुक्तीक असल्याचा पालिकेचा विचार आहे.

या गॅलरीसाठी आराखडा तयार करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र लॉकडाउननंतर हे काम थांबलेले होते. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (एमसीझेडएमए) अर्ज केला होता. आता या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या कामासाठी ३ कोटी ५० लाख खर्च येणार आहे. सर्व करांचा विचार करता महापालिकेला ४ कोटी ५९ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

उचावर उभारणार गॅलरी

समुद्राची भरती-ओहोटी लक्षात घेत ही गॅलरी उंचावर बांधली जाणार आहे. योग्य ती उंची असल्याने पावसातही पर्यटकांना लाटांचा आस्वाद घेता येणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या गॅलरीत जाता यावे म्हणून तिला उतारही ठेवण्यात येणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here